मुख्यपृष्ठ
मुख्यपृष्ठ
मनुष्यप्राण्याचा उत्क्रांतिप्रवास
पृथ्वीवर होऊन गेलेल्या वा अस्तित्वात असलेल्या सर्व प्राण्यांत होमो सॅपिअन्स या प्राण्याने बुद्धिमत्तेची सर्वोच्च पातळी गाठली आहे. होमो सॅपिअन्स हे जीवशास्त्रीय नाव धारण करणारा हा प्राणी म्हणजे अर्थातच माणूस. ‘होमो’ ही त्याची प्रजाती आणि ‘होमो सॅपिअन्स’ ही त्याची जाती. नरवानराच्या (प्रायमेट) पूर्वजांपासून या होमो सॅपिअन्सची उत्क्रांती झाली आहे. नरवानर हा लेमूर, माकडं, कपी (एप्स) अशा विविध... (पूर्ण लेखासाठी...)
सर्वोच्च शिखरामागची गोष्ट
जगातल्या सर्वोच्च शिखराचा मान हिमालयातल्या एव्हरेस्ट शिखराकडे जातो. गेल्या पाऊणशे वर्षांत जरी हजारो गिर्यारोहकांनी हे सर्वोच्च शिखर सर केलं असलं, तरी एव्हरेस्ट शिखरावर पोहचणं हा आजही एक मानबिंदू समजला जातो. गिर्यारोहकांसाठी आकर्षण ठरलेलं हे शिखर, सर्वोच्च असल्याचं लक्षात येण्याच्या अगोदरच्या काळात मात्र जवळपास दुर्लक्षितच होतं. हे शिखर जगातलं सर्वोच्च शिखर असल्याचं... (पूर्ण लेखासाठी...)
पृथ्वीवरचे महाविनाश
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जाती-प्रजातींत उत्क्रांतीद्वारे सतत बदल होत असतात. सजीवांच्या काही जातीप्रजाती नष्ट होत असतात, तर काही नवीन जाती-प्रजाती निर्माण होत असतात. मात्र पृथ्वीवरील जीवसृष्टीची ही उत्क्रांती नेहमीच काही सलगपणे, सहजपणे घडत आलेली उत्क्रांती नसते. काही वेळा अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वातावरणीय, भौगोलिक बदलांमुळे अत्यल्प काळातच सजीवांचा... (पूर्ण लेखासाठी...)
वैज्ञानिक नारळीकर...
ज्यांच्या संशोधनाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला, अशा भारतीय संशोधकांपैकी एक नाव म्हणजे प्रा. जयंत विष्णू नारळीकर. हे नाव विश्वरचनाशास्त्राशी अगदी घनिष्ठपणे जोडलं गेलं आहे. कारण विश्वरचनेच्या, एका वेगळ्याच सिद्धान्ताद्वारे केल्या गेलेल्या उकलीत प्रा. जयंत नारळीकरांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रा. जयंत नारळीकरांच्या संशोधनाचा मोठा भाग हा गुरुत्वाकर्षणाशीही संबंधित... (पूर्ण लेखासाठी...)
सर्पविष ‘पचवलेला’ माणूस
अमेरिकेत राहणारा टिमोथी फ्रिड हा एक सर्पप्रेमी माणूस आहे. त्याला साप हाताळण्याचा छंद आहे. त्याने आतापर्यंत अनेक प्रकारचे अत्यंत विषारी साप हाताळले आहेत. आपला हा छंद जोपासताना त्याला या विषारी सापांकडून दंश होतात. हे दंश अत्यंत धोकादायक ठरू शकतात. या सर्पदंशांना तोंड देण्यासाठी त्याने एक वेगळाच मार्ग चोखाळला. वेगवेगळ्या विषारी सापांचं विष त्याने स्वतःला टोचून घेतलं... (पूर्ण लेखासाठी...)
जीवहीन पृथ्वी
पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्क्रांती ही पृथ्वीच्या उत्क्रांतीशी निगडित आहे आणि पृथ्वीची उत्क्रांती ही विश्वाच्या उत्क्रांतीशी निगडित आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या घटकांपासून तयार झाली आहे, त्या सर्व घटकांची निर्मिती हा विश्वाच्या उत्क्रांतीचाच एक भाग आहे. त्यामुळे जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा विचार करताना विश्वाच्या उत्क्रांतीचाही परामर्श घ्यावा लागतो. विश्वाच्या या उत्क्रांतीला सुरुवात झाली ती... (पूर्ण लेखासाठी...)
वूली मॅमथ आणि त्याचं पुनरागमन!
पृथ्वीच्या इतिहासात अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी होऊन गेले. त्यातलाच अगदी अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात असलेला, मोठ्या आकाराचा एक प्राणी म्हणजे वूली मॅमथ. काही हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला हा प्राणी युरोपचा उत्तर भाग, अलास्का, कॅनडा, रशियाच्या उत्तरेकडचा सायबेरियासारखा प्रदेश, अशा विविध ठिकाणच्या थंड प्रदेशात वास्तव्याला होता. बराचसा आजच्या हत्तीसारखा दिसणारा आणि... (पूर्ण लेखासाठी...)
प्रथिनांच्या रचना
आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा रासायनिक घटक म्हणजे प्रथिनं. मग ती प्रथिनं म्हणजे शरीरातील स्नायू, उती, वगैरे भाग ज्यापासून तयार झाले आहेत ती प्रथिनं असू शकतात; शरीरातल्या चयापचय किंवा तत्सम अत्यावश्यक जैवरासायनिक क्रियांत भाग घेणारी, विकरांच्या किंवा संप्रेरकांच्या स्वरूपातील प्रथिनं असू शकतात; शरीराचं बाह्यशत्रूंपासून रक्षण करणारी प्रतिपिंडांच्या स्वरूपातली प्रथिनं असू शकतात. इतकंच काय... (पूर्ण लेखासाठी...)
‘वजनरहित’ संशोधन
पृथ्वीवर राहणारे आपण सर्व जण गुरुत्वाकर्षणाद्वारे पृथ्वीशी जखडले गेलो आहोत. त्यामुळे पृथ्वीवर जे काही घडत आहे, ते सर्व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली घडत आहे. कुठल्याही सजीव वा निर्जिव वस्तूचे गुणधर्म जेव्हा पृथ्वीवर अभ्यासले जातात, तेव्हा या वस्तूंवरचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव दूर करता येत नाही. गुरुत्वाकर्षणविरहित परिस्थितीत वस्तूचे गुणधर्म वेगळे जाणवू शकतात... (पूर्ण लेखासाठी...)
संपर्कः vidnyanmarg@gmail.com